डॉ. सुनील जाधव
एम.बी.बी.एस. ; डी.टी.सी.डी. ;
डी.एन.बी. (रेस्पायरेटरी मेडिसीन)
के.ई.एम. हॉस्पिटल,
मुंबई
कन्सलटंट चेस्ट फिजीशियन
(छाती व फुफ्फुस
विकार तज्ञ)
छत्रपती संभाजीनगर येथे २००३ पासून चेस्ट फिजीशियन (छाती व फुफ्फुस विकार तज्ञ)
म्हणून कार्यरत
प्राध्यापक
श्वसन विकार विभाग,
एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, औरंगाबाद
ओ.पी.डी.ची वेळ
सोमवार ते शुक्रवार : स. ११ : ०० ते सं. ०६ : ०० पर्यंत
शनिवारी : पूर्व नोंदणी असल्यास,
रविवारी बंद
अस्थमा (दमा), सीओपीडी, टी.बी. (क्षयरोग), न्युमोनिया,
फुफ्फुसाचा कॅन्सर, इंटरस्टिशियल लंग डिसीजेस, ब्रॉन्कोस्कोपी
(दुर्बिणीव्दारे फुफ्फुसाची तपासणी) थोऱ्याकोस्कोपी (दुर्बिणीव्दारे छातीची
तपासणी),
छातीमध्ये पाणी किंवा हवा भरणे, (प्ल्युरल इफ्युजन किंवा न्युमोथोरॅक्स)
घोरण्याचे आजार (स्लीप मेडीसीन), फुफ्फुसाचे इतर आजार
स्पायरोमेट्री ही फुफ्फुसांची कार्यक्षमता पाहण्यासाठी आणि श्वासमार्गात किती प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे हे पडताळण्याची सर्वात सामान्य तपासणी आहे. जर रुग्णास धाप लागणे, श्वास घेताना घरघर जाणवणे किंवा खोकला लागणे अशी लक्षणे असल्यास स्पायरोमेट्री या तपासणीची गरज भासते. या तपासणीद्वारे दमा (अस्थमा), सी.ओ.पी.डी. या आजारांचे निदान करता येते व आजाराची तीव्रता पाहता येते.
दमा (ब्रॉन्कियल अस्थमा) हा श्वासनलिकेचा एक दीर्घकालीन आजार आहे.
सी.ओ.पी.डी. म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा श्वासनलिका व फुफ्फुसाच्या इतर भागांना झालेल्या इजांमुळे होणारा दीर्घकालीन आजार आहे. दीर्घकाळ धूम्रपान करणे, वायूप्रदूषण, चुलीच्या धुराचा संपर्क इ. ही त्याची मुख्य कारणे आहेत.
क्षयरोग हा एक जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे तो बहुतेकदा फुफ्फुसांवर
परिणाम
करतो.
क्षयरोग हा एक टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होण्याजोगा रोग आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग हा एक घातक आजार आहे. दीर्घकालीन धुम्रपान, वायुप्रदूषण, ही त्याची प्रमुख कारणे आहेत. धुम्रपान न करणाऱ्या काही व्यक्तिंनादेखिल हा आजार उद्भवतो.
न्युमोनिया म्हणजे फुफ्फुसांना होणार जंतुसंसर्ग होय. विविध जीवाणू , विषाणू किंवा बुरशीमुळे फुफ्फुसांस हा जंतूसंसर्ग होऊ शकतो.
ब्रॉन्कोस्कोपी ही फुफ्फुसातील व श्वासनलिकांमधील आजारांसाठी दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी तपासणी आहे.
थोरॅकोस्कोपी किंवा प्ल्यूरोस्कोपी ही फुफ्फुसा बाहेरील व छातीच्या आतील आवरणाची (प्ल्युरल स्पेस) दुर्बिणीद्वारे केली जाणारी तपासणी आहे.
फुफ्फुसांबाहेरील आवरणांमध्ये जास्त प्रमाणात द्रव जमा होणे यालाच प्ल्युरल इफ्युजन असे म्हणतात.
फुफुसाबाहेरील आवरणांमध्ये हवा भरणे याला न्यूमोथोरॅक्स असे म्हणतात.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नीया या आजारामध्ये झोपेदरम्यान श्वास मार्ग अंशत: किंवा पूर्णपणे काही वेळासाठी बंद पडतो व ही श्वासमार्ग बंद पडण्याची घटना वारंवार घडते.
इंटरस्टिशीयल लंग डिसीज ( ILD) हा २०० पेक्षा जास्त विविध आजारांचा समुह आहे. या आजारामध्ये फुफ्फुसामधील वायुकोष व त्यांच्या सभोवतालच्या रक्तवाहिन्या यांच्या मधील पेशीचे नुकसान (फायब्रॉसिस) होते. परिणामी फुफ्फुसातून रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात मिसळला जातो. म्हणून रुग्णास दम लागतो.